नमस्कार मंडळी…!!
आपल्या सर्वांना माहित आहे कि लग्न म्हटले कि सर्वांना खूप आनंद होत असतो. कारण लग्नात जी मज्जा मस्ती आणि धमाल करायला मिळते तशी मज्जा मस्ती आणि धमाल बाकी गोष्टीत नाही करता येत. लग्नाच्या १ महिन्यापासून वेग वेगळे कार्यक्रम केले जातात. मग तो जागरण गोंधळ असो किंवा मेहेंदीचा कार्यक्रम किंवा मग हळद. आता तर सध्या संगीतचा देखील एक दिवस करण्यात येतो. त्यात प्रत्यके जण कोणत्या न कोणत्या गाण्यावर डान्स तसेच वेग वेगळे नृत्य ह्यांचे सादरीकरण करत असतो…
पण लग्नात जी मज्जा गावात किंवा खेड्यात येते ती मज्जा शहरात येत नाही. हे १००% खरं आहे. खेडे गावात किंवा गावाकडे जे लग्न होत त्यात एक वेगळीच मज्जा असते. आपण प्रत्येक जण बिन्दास्त होऊन लग्नाचा आनंद घेत असतो. लग्नामध्ये किंवा हळदी मध्ये गावाकडे पारंपरिक पद्धतीने नृत्य होत. ते आजच्या तरुण पिढी साठी खूप वेगळे असते. तसेच गावाकडील गाणे हे नाचण्यासाठी खूप मज्जा देणारे असते. आज काल च्या गाण्यापेक्षा जी जुनी गावाकडची गाणी आहेत त्यावर नाचायला खूप मज्जा येते.
लग्न म्हटले कि सर्व घरात आनंदाचे वातावरण फसरते. सर्व लोक लग्नाच्या तयारीला लागतात. कोणी कपड्याची खरेदी करते तर कोणी सोन चांदीची तर कोणी खाण्याच्या वस्तू बनवतात. तसेच लग्नाची पूर्व तयारी म्हणून विडिओ ग्राफर तसेच फोटो ग्राफर ह्यांची बुकिंग करण्यात येते. लग्नाचा हॉल, डी.जे, बँड ह्याची बुकिंग केली जाते. लग्नाच्या आधी वेग वेगळे कार्यक्रम देखील करण्यात येतात.
मग तो साखरपुड्याच्या कार्यक्रम असो वा जागरण गोंधळाचा त्याची देखील तयारी करण्यात येते. लग्नाच्या ५-६ महिन्या अगोदरच सर्व गोष्टींची तयारी खूप आनांदात चालू असते. तसेच आधीच्या काळात नवरदेव नवरी डायरेक्ट लग्नात एकमेकांना भेटायचे पण आता प्री-वेडिंग शूट देखील करण्यात येतो. वेग वेगळ्या निर्सगाच्या सुंदर ठिकाणी जाऊन नवरी नवरदेव प्री-वेडिंग फोटोग्राफी आणि विडिओ ग्राफी करतांना दिसतात.
तसेच लग्नाच्या ३-४ दिवस अगोदरच वेग वेगळे कार्यक्रम देखील ठेवण्यात येतात. त्यात मेहेंदीचा कार्यक्रम असतो तसेच संगीताचा कार्यक्रम असतो. तर काही लग्नात जागरण गोंधळाचा कार्यक्रम असतो. लग्नाच्या आधी संगीताचा कार्यक्रम करण्यात येतो त्यात सर्व लोक आपल्या आपल्या पद्धतीने डान्स करत असतात. संगीताच्या कार्यक्रमात डी.जे व्यवस्था केलेली असते म्हणून तो दिवस खूप मज्जा मस्ती करणारा दिवस असतो.
सर्व लोक त्या दिवशी खूप मज्जा करतात. तसेच हळदीला देखील डी.जे किंवा बँड लावलेला असतो तो दिवस देखील खूप मज्जा मस्तीचा दिवस असतो. नवरदेव नवरी च्या आययूष्यातील सर्वात आनंदाचे दिवस असता म्हणून दोघे हि आणि त्याचे घरचे, नातेवाईक खूप आनंदांत असतात.
आज काल लग्नाच्या वरातीत सुंदर असे डान्स बघायला मिळतात. सदर विडिओ मध्ये वहिनींनी आपल्या दिराच्या लग्नात सुंदर असा डान्स केला आहे. तुम्हाला सर्वांना ” हम आपके है कोण ” चित्रपट माहीतच असेल. त्या चित्रपटाचे एक प्रसिद्ध गाणं आहे ” लो चली में अपनी देवर कि बारात लेके “. त्यात सलमान खान ची वहिनी सलमान सोबत ह्या गाण्यावर डान्स करते. सोबत माधुरी दीक्षित देखील असते.
त्याचं अनुकरण करून ह्या लग्नात देखील वहिनींनी त्याच प्रमाणे अतिशय सुंदर असा ” लो चली में अपनी देवर कि बारात लेके ” ह्या गाण्यावर डान्स सादर केला आहे. ह्या सादरीकरण मुळे लग्नाला एक वेगळी शोभा आलेली दिसत आहे. चला तर मग बघूया आपल्या दिराच्या लग्नात वहिनींनी केला सुंदर डान्स…
विडिओ नक्की बघा –