शाळेत पप्पू आणि सोन्या हसतात…

नमस्कार मंडळी…

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया !!!

विनोद १- एक पुणेरी माणूस वॅक्सीन घ्यायला जातो, खूप बडबड करत असतो… “डॉक्टर, दुखेल का?” डॉक्टर गप्प….. “डॉक्टर, साईड इफेक्टस कधी जाणवतील?” डॉक्टर गप्प…..
“डॉक्टर, हे वॅक्सीन काम करेल ना? अहो काहीतरी बोलाल की नाही?” डॉक्टर गप्पच! वॅक्सीन दिल्यावर मात्र डॉक्टर म्हणाले, ” काळजी करू नका, सगळं ठीक होईल.”
“पेशंटने विचारलं ” आतापर्यंत गप्प होतात आणि टोचून झाल्यावर मग बोललात.. असं का बरं? ”
“डॉक्टर म्हणाले, ” माझं सर्व शिक्षण पुण्यातच झालंय. तिथे मोजकंच बोलतात. पण जेव्हा बोलतात तेव्हा…. टोचूनच बोलतात!” 😂🤣😂

विनोद २- मी आणी माझे बॉस दा रू पिऊन गाडीने घरी जात होतो.
तेव्हा मी ओरडलो, सर, समोर भिंत बघा. भिंत आहे, भिंत, भिंत बघा… आणि धम्म…. आम्ही भिंतीवर जोरात आपटलो.
दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलमध्ये मी सरांना विचारलं, मी ओरडून ओरडून सांगत होतो भिंत आहे, भिंत आहे, ऐकलं की नाही तुम्ही ?
सर बोलले, ऐकून काय केलं असतं बेव ड्या… गाडी तर तू चालवत होतास. 🤨🤓😃😃

विनोद ३- नवरा बायको एका हाॅटेल मधे जेवायला गेले असतानाचा संवाद…. बायको – आहो.. मला एक सांगा ना !!🙂
नवरा – हा विचार काय ते… !!🤨 बायको – ही हाॅटेल मधील झाडे वाढत का नाहीत..?🤔
नवरा – कारण इथे वाढायला वेटर असतात… 🤪 🤦🏻‍♂ 🤦🏻‍♂ 🤦🏻‍♂
(बायकोने एक कुंडी उचलून मारली म्हणे…) सूत्रांच्या माहिती नुसार😄😄😄😄

विनोद ४- नवरा-बायको एका लग्नाला गेले होते……बायकोची मैत्रीण- अगं, ती साडीतली मुलगी एकसारखी तुझ्या नवऱ्याकडे बघतेय.
बायको – महीत आहे,पण माझं लक्ष त्यांच्याकडे जास्त आहे.
किती वेळ पोट आत घेऊन उभे राहू शकता
ते मला बघायचं आहे. 😛😝🤪

विनोद ५- बायको- म्हणजे..? संपलं का वर्क फ्रॉम होम..? नवरा- हो ना… आता ऑफिसला जावं लागणार…
बायको- बरं ऐका… नवरा- काय गं… बायको- ऑफिस सुटल्यावर उशीर होणार असेल तर खूप काम होतं असं कारण सांगू नका..
तुम्ही किती आणि काय काम करता, ते बघितलंय मी गेली दीड वर्ष…😅😅

विनोद ६- “साड्यांचा रंग जाणार,नाही गेल्यास पैसे परत.” असा बोर्ड वाचून स्त्रियांची दुकानात साड्या खरेदीसाठी झुम्बड उडते.
घरी गेल्यावर कळते की सर्व साड्यांचा रंग तर जातोय.😳 सर्व स्त्रिया साड्या घेऊन दुकानात जातात.दुकानदारावर खेकसतात.दुकानाचा बोर्ड आणि प्रत्यक्ष विक्री यांत फसवणूक करत असल्याची तक्रार करतात.
सर्व ऐकून घेतल्यावर दुकानदार शांतपणे त्यांना म्हणतो,मी तुमची अजिबात फसवणूक केलेली नाही. #बोर्डपुन्हानीट_वाचा.😃😃😃
दुकानदार कोण होता हे सांगायला नको😂 😂पुण्यात गेलात तर स्वल्प,अल्प,अर्ध,पूर्ण विराम चिन्हे वाचत चला !

विनोद ७- एका हॉटेलात शिरत असताना समोरच एक बोर्ड झळकत होता… ‘पोटभर जेवा, मनसोक्त खा, बिनधास्त मागवा…बिल तुमचा नातू देईल!’
साहजिकच एकजण आत शिरला…हवं ते मागवलं…मनसोक्त खाल्लं! कारण नातू अजून जन्माला यायचा होता…तो बघून घेईल!
पोटभर जेवून, पोटावर हात फिरवत जेव्हा तो काउन्टरवर आला… त्याच्या हातात बिल पडलं!
‘आता हे बिल कसलं?’ त्यानं चौकशी केली…मॅनेजरने सांगितलं, “तुमचे आजोबा पोटभर जेवून गेले होते!”😂😂😂😂

विनोद ८- ८००० रुपये टेलिफोन बिल आल्यामुळे बबन वैतागला होता, मी माझ्या ऑफिसचा फोन वापरतो मग एवढं बिल कस?
बायको : मी पण माझ्या ऑफिसचा फोन वापरते. मी कशाला घराचा फोन वापरू.
मुलगा : मला तर ऑफिसने सेलफोन दिलाय. मी कशाला घराचा फोन वापरू.
कामवाली : म्हणजे आपण सगळेच कामावरचे फोन वापरतो, मग एवढं बिल कस? 😂😜😂😂

विनोद ९- हसलाच पाहिजे भाऊ 😄 😄 😄 😄 शिक्षकांचा मोर्चा चालू असतो.सगळे शिक्षक घोषणा देत असतात.
मोर्चाच्या पाठिमागे केळीविक्रेता असतो……शिक्षक- “पगार वाढ झालीच पाहिजे.”.
विक्रेता- ” केळं घ्या केळं” शिक्षक-आमच्या मागण्या मान्य झाल्या पाहिजे…..विक्रेता- केळं घ्या केळं🍌🍌🍌
लय धुतला केळं विक्रेत्याला 😝 😆 😂 😆 😝

विनोद १०- शाळेत पप्पू आणि सोन्या जोर जोरात हसत हसतात…
मॅडम- सोन्या एकटा एकटा का हसतोय?? आम्हाला पण सांग आम्ही पण हसू…
सोन्या- नको मॅडम तुम्हाला राग येईल…. मॅडम- सांग नाही येणार…
सोन्या- मॅडम पप्पू सांगतोय मॅडम लाल साडीत एकदम कॉ ल ग र्ल दिसतेय 🤣🤣🤣🤣

नेहमी प्रमाणे आज हि आम्ही तुमच्यासाठी नवीन मराठी विनोद घेऊन आलोय.. ते वाचल्यानंतर तुम्ही नक्की हसणार आणि तुम्हाला ते विनोद खूप आवडतील आणि हा शेयर करायला विसरू नका….. कारण तुम्ही शेयर किंवा कंमेंट करता तर आम्हाला चांगले वाटते.. विनोद हा जेवनाप्रमाणे असतो जसे जेवण केल्यावर पोट भरते तसेच विनोद वाचल्याने हसून हसून आपले पोट भरते… म्हणून रोज किमान ३-४ विनोद नक्की वाचत जा… विनोद वाचल्यामुळे आपण हसतो आणि हसल्यामुळे आपले आरोग्य निरोगी राहते… चला तर मग हसण्याच्या आपल्या कॉमेडी एक्सप्रेसला सुरुवात करूया !!!