नमस्कार मंडळी…!!
आपल्या सर्वांना माहित आहे कि लग्न म्हटले कि सर्वांना खूप आनंद होत असतो. कारण लग्नात जी मज्जा मस्ती आणि धमाल करायला मिळते तशी मज्जा मस्ती आणि धमाल बाकी गोष्टीत नाही करता येत. लग्नाच्या १ महिन्यापासून वेग वेगळे कार्यक्रम केले जातात. मग तो जागरण गोंधळ असो किंवा मेहेंदीचा कार्यक्रम किंवा मग हळद. आता तर सध्या संगीतचा देखील एक दिवस करण्यात येतो. त्यात प्रत्यके जण कोणत्या न कोणत्या गाण्यावर डान्स तसेच वेग वेगळे नृत्य ह्यांचे सादरीकरण करत असतो…
पण लग्नात जी मज्जा गावात किंवा खेड्यात येते ती मज्जा शहरात येत नाही. हे १००% खरं आहे. खेडे गावात किंवा गावाकडे जे लग्न होत त्यात एक वेगळीच मज्जा असते. आपण प्रत्येक जण बिन्दास्त होऊन लग्नाचा आनंद घेत असतो. लग्नामध्ये किंवा हळदी मध्ये गावाकडे पारंपरिक पद्धतीने नृत्य होत. ते आजच्या तरुण पिढी साठी खूप वेगळे असते. तसेच गावाकडील गाणे हे नाचण्यासाठी खूप मज्जा देणारे असते. आज काल च्या गाण्यापेक्षा जी जुनी गावाकडची गाणी आहेत त्यावर नाचायला खूप मज्जा येते.
आज काल लग्नाच्या वरातीत सुंदर असे डान्स बघायला मिळतात. सदर विडिओ मध्ये वहिनींनी आपल्या दिराच्या लग्नात सुंदर असा डान्स केला आहे. तुम्हाला सर्वांना ” हम आपके है कोण ” चित्रपट माहीतच असेल. त्या चित्रपटाचे एक प्रसिद्ध गाणं आहे ” लो चली में अपनी देवर कि बारात लेके “. त्यात सलमान खान ची वहिनी सलमान सोबत ह्या गाण्यावर डान्स करते.
सोबत माधुरी दीक्षित देखील असते. त्याचं अनुकरण करून ह्या लग्नात देखील वहिनींनी त्याच प्रमाणे अतिशय सुंदर असा ” लो चली में अपनी देवर कि बारात लेके ” ह्या गाण्यावर डान्स सादर केला आहे. ह्या सादरीकरण मुळे लग्नाला एक वेगळी शोभा आलेली दिसत आहे. चला तर मग बघूया आपल्या दिराच्या लग्नात वहिनींनी केला सुंदर डान्स…
बघा विडिओ-